www.24taas.com, वॉशिंग्टन
अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ज्या अमेरिकेच्या सील कमांडोने गोळ्या घालून ठार केले, त्यालाच हालाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ही धनाढ्य अमेरिकेतील बाब उघड झाल्याने आश्चर्च व्यक्त होत होत.
मे २०११मध्ये अमेरिकेच्या नौसेनेच्या एका सील कमांडोने ओसामा लादेनचा खात्मा केला होता. त्यानंतर अमेरिकेवर कौतुकाचा वर्षाव होत होता. मात्र, श्रीमंत अमेरिकेच्या या जवानावर सैन दलातून निवृत्त झाल्यानंतर उपासमारीची वेळ आली आहे. तो जवान सध्या हालाकीचे जीवन जगत आहे.
अमेरिकेच्या वायुसेनेतील सहा सदस्यांच्या एका सदस्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठार करण्यासाठी जीवावर उदार होवून लादेनला गोळी घातली. मात्र, त्याच्या निवृत्तीनंतर अमेरिकेतील नौसेनेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे.
नौसेनेतून सील कमांडो निवृत्त झाल्यानंतर त्याला आरोग्याची सुविधा मिळालेली नाही. त्याच्याकडे आरोग्य विमा संरक्षण कवच नसल्याने त्याला निवृत्तीचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आलीय. हा जवान एकदम हालाकीचे जीवन जगत आहे. ही अमेरिकेची नामुष्की असल्याची बोलले जात आहे.
अमेरिकी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आरोग्य विमा संरक्षण कवच मिळत नाही. त्यामुळे अमेरिकन सैन्याकडून निवृत्त जवानांची काळजी घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत एका माजी कमांडोने सांगितले की, मीही बंद झालेल्या आरोग्य सुविधेबाबत चौकशी केली. त्यावेळी मला उत्तर दिले गेले की, तुम्ही आता सैन्यात नाही. त्यामुळे तुम्हाला या सुविधेचा लाभ मिळू शकत नाही. उलट त्यांनी १६ वर्षे सेवा केल्याबद्दल आभार मानून मला घरचा रस्ता दाखवला.
लादेनचा खात्मा करणारा माजी सील कमांडो याची ओळख ही ‘द शुटर’ अशी आहे. मात्र, लादेनविरोधात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन अभियानाबाबत त्याला काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती. मात्र, हा जवान सांगतो, लादेनच्या डोक्यात दोनदा गोळ्या घातल्या. दुसरी गोळी झाडली तेव्हा लादेन खाली कोसळला. आपल्या अंथरूनावर पडल्यानंतर लादेन मृत पावला.
माजी सील कमांडोने स्पष्ट केले की, लादेनच्याजवळ बंदुक पडलेली होती. त्यामुळे मला लादेनवर गोळी चालविणे भाग पडले. लादेन ज्यावेळी खाली पडला त्यावेळी त्याचा मुलगा रडत होता.