www.24taas.com,नवी दिल्ली
पाकिस्तानमध्ये कुख्यात दहशतवादी हाफिज सईदशी एकत्रितपणे व्यासपीठावर झळकल्याने जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक पुन्हा एकदा गोत्यात आलाय.
देशाच्या दुश्मनांशी संबंध कशासाठी असा सवाल करत भाजपसह नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनीही सरकारवर निशाणा साधलाय. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, कंधार विमान अपहरण प्रकरणांसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हाफिज सईदचं दहशतवादी कनेक्शन उघड झालंय.
कनेक्शन उघड झाल्यामुळे अशा दहशतवाद्याबरोबर एकत्रितपणे दिसल्याने यासीन मलिकचेही दहशतवादी कनेक्शन उघड झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागलीये.
चोहोबाजूने टीका सुरू झाल्याने गृहमंत्रालयालाही जाग आलीये. यासीन मलिकवर यापुढे बारकाईने नजर ठेवली जाईल, असं गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.