कराची: एकीकडे पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुरापती सुरु असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला धमकी दिलीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर भारताची मोठी हानी होईल, अशी दर्पोक्ती पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी केलीय.
आणखी वाचा - पाकिस्तानात दाऊदचे नऊ ठिकाणं
युद्ध झालं, तर भारतीयांच्या अनेक पिढ्या त्याचे परिणाम भोगतील, असं विधान ख्वाजा आसीफ यांनी केलंय. काही दिवसांपूर्वीच सरताज अजिज यांनी भारतावर अणू बाँम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. पाकिस्तानचे अणूबॉम्ब जपून ठेवण्यासाठी तयार केलेले नाहीत, असा धमकीवजा इशारा याआधी देण्यात आला होता.
आणखी वाचा - आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत - सरताज अझीझ
भारत पाकिस्तानसह इतर शेजारील राष्ट्रांमध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलंय. पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार बंद झाल्यानंतरच चर्चा होऊ शकते असही त्यांनी सांगितलं. दरम्यान पाकिस्तानी नेत्यांच्या या आक्रस्ताळ्या विधानाचा भारतात तीव्र निषेध व्यक्त होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.