www.24taas.com, नवी दिल्ली
एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग मीडियाद्वारे ईशान्य आणि इतर भारतीय नागरिकांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम पाकिस्तानातूनच घडलं असल्याचं उघड झालं असलं, तरीही पाकिस्तान मात्र ह मान्य करायला तयार नाहीच. पाकिस्तानचा यात सहभाग असल्याचे पुरावे मागितले आहेत.
भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पाक गृहमंत्री रेहमान मलिक यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. यात भारताला पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छित असल्याच्यं वक्तव्य शिंदे यांनी केलं. मात्र पाकिस्तानातून भारतामध्ये अशांतता पसरवणाऱ्या शक्तींना रोखण्यात पाकिस्तानने भारताला सहाय्य करावं, असं आवाहनही शिंदे यांनी केलं.
यावर भारतातील धार्मिक भावना भडकवणारे लोक जर पाकिस्तानमध्ये असतील तर त्यासंबंधीचे पुरावे सादर भारताने सादर करावेत असं मलिक यांनीच शिंदेंना सांगितलं.
भारताचे आरोप फेटाळून लावत विदेश मंत्रालयाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. तांत्रिक उपकरणं कुण्या एकाच्या हातात किंवा शहरात नसतात. त्यामुळे भारतीय लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून भारतीय गृहमंत्र्यांनी हा निष्कर्ष काढला असावा, असं विदेशी मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.