पाक पंतप्रधानांच्या अटकेचे आदेश

पाकिस्तान सरकार आणि सत्तारूढ़ पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)ला मोठा झटका बसला आहे. पाक पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांना अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 15, 2013, 03:46 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तान सरकार आणि सत्तारूढ़ पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)ला मोठा झटका बसला आहे. पाक पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांना अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
रेंटल पॉवर प्रोजेक्टच्या २२ अब्ज करोड घोटाळ्याबाबत त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. याप्रकणी सर्वोच्य न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहे. मुख्य न्यायाधीश इफ्तिखार महम्मद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
राज परवेझ अशरफ यांच्यासह १६ जणांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच तीन माजी कॅबिनेट मंत्र्यांचा आणि सरकारच्या काही विभागाचे चार माजी सचिव यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
पंतप्रधान अशरफ यांनी २००८मध्ये लाच आणि कमिशन मिळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.