लग्नातले चोचले बंद, एकापेक्षा जास्त डिश दिसल्या तर...

लग्न म्हटलं की सगळ्यानांच उत्सुकता, मग ते कोणत्याही जातीतलं असो किंवा कोणत्याही देशातलं असो... मग, अशा या भव्य - दिव्य लग्नांचा खर्चही तितकाच अवाढव्य... पण, पाकिस्तानात मात्र असे शाही सोहळे गुन्हा ठरणार आहेत.

Updated: Apr 16, 2016, 04:33 PM IST
लग्नातले चोचले बंद, एकापेक्षा जास्त डिश दिसल्या तर... title=

नवी दिल्ली : लग्न म्हटलं की सगळ्यानांच उत्सुकता, मग ते कोणत्याही जातीतलं असो किंवा कोणत्याही देशातलं असो... मग, अशा या भव्य - दिव्य लग्नांचा खर्चही तितकाच अवाढव्य... पण, पाकिस्तानात मात्र असे शाही सोहळे गुन्हा ठरणार आहेत.

पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात फटाक्यांवर आणि हुंडा घेण्या-देण्यावर पूर्णत: बंदी घातली गेलेली आहेच... शिवाय लग्नात उपस्थितांसाठी एका डिश पेक्षा जास्त पदार्थ ठेवायचे पण नाहीत आणि द्यायचे ही नाहीत, असा कायदाच करण्यात आलाय. हा कायदा न पाळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.  

कायदे तोडणाऱ्यांना शिक्षा...
हे कायदे मोडले तर एका महिन्याची कारावासाची शिक्षा आणि २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय. हे नियम पाळल्याने लग्नामध्ये साधेपणादेखील दिसेल आणि अनावश्यक गोष्टींवर बंदी राहील, असं मत पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.

कोणावर केली जाईल कारवाई...
- फटाके फोडणाऱ्यांवर किंवा ते फटाके फोडणाऱ्यांस प्रवृत्त करणाऱ्यांवर
- जसं लग्नात असलेल्या जेवणात एका डिश पेक्षा जास्त पदार्थ ठेवणाऱ्यांवर आणि वाढणाऱ्यांवरही होणार कारवाई
- हॉटेल, रेस्ट्रॉरंट, कॅटरर्स चालवणाऱ्यांवरदेखील ही कारवाई केली जाईल
- महत्त्वाची म्हणजे, लग्नाचे कार्यक्रम हे रात्री १० वाजल्याच्या आत संपले पाहिजेत, अन्यथा अशा लोकांवरही कारवाई केली जाईल