पाकिस्तानने नेपाळला मदत म्हणून पाठवला 'बीफ मसाला'

पाकिस्तानने भूकंप पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप पाकिस्तानवर होतोय.

Updated: Apr 30, 2015, 04:56 PM IST
पाकिस्तानने नेपाळला मदत म्हणून पाठवला 'बीफ मसाला'  title=

काठमांडू : पाकिस्तानने भूकंप पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप पाकिस्तानवर होतोय.

नेपाळमध्ये शक्तीशाली भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळ जगभरातून मदतीच्या प्रतीक्षेत असताना, पाकिस्तानने नेपाळला मदत म्हणून पाठविलेल्या साहित्यात बीफ मसाला पाठविण्यात आला आहे.

नेपाळला जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, पाकिस्तानमधून हिंदूराष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आलेल्या मदतीवर आक्षेप घेण्यात येत आहे. 

नेपाळमध्ये गोहत्या बंदी आहे. अशातच पाकिस्तानकडून हिरव्या रंगाच्या पाकीटांतून मदत म्हणून बीफ मसाला पाठवला आहे.

 धार्मिक भावना भडकाविण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम असलम यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

काठमांडूतील बीर रुग्णालयातील भारतीय डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पाठविलेल्या मदतीमध्ये बीफ मसाल्याची पाकीटे आहेत. याबाबत नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि गुप्तचर यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.