नवी दिल्ली : गेल्यावर्षी पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेत दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेला. यानंतर पाकिस्तानात दहशतवादावर वादावादी सुरू झाली.
एका भारतीयाने पाकिस्तानला भेट दिली आणि तेथील शाळेतील काही विद्यार्थिनींशी संवाद साधला. यात एक वादविवाद स्पर्धा घेतली गेली आणि विद्यार्थिनींनी अण्वस्त्र, दहशतवाद यांसारख्या विषयांवर आपली मतं मांडली.
काहींची मतं धक्कादायक आहेत; तर एका विद्यार्थिनीच्या मते 'आमच्या घरातल्या लोकांमुळेच आमचं जास्त नुकसान होतंय'.
हा व्हिडीओ सध्या यू-ट्यूबवर चांगलाच गाजतोय... नक्की या विद्यार्थिनींचं काय आहे मत, पाहा हा व्हिडीओ