मी दाऊदला कराचीत भेटलो, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

 भारताचा क्रमांक १ चा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानात लपून बसल्याचे भारताने संपूर्ण पुराव्यानिशी सांगितले तरी त्याचा पाकिस्तान या गोष्टीचा इन्कार करीत आहे. पण पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आरिफ जमाल यांनी दावा केला आहे की, दाऊद पाकिस्तानात राहतो आणि त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची भेट घेतली आहे. 

Updated: Aug 26, 2015, 07:33 PM IST
 मी दाऊदला कराचीत भेटलो, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा title=

कराची  :  भारताचा क्रमांक १ चा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानात लपून बसल्याचे भारताने संपूर्ण पुराव्यानिशी सांगितले तरी त्याचा पाकिस्तान या गोष्टीचा इन्कार करीत आहे. पण पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आरिफ जमाल यांनी दावा केला आहे की, दाऊद पाकिस्तानात राहतो आणि त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची भेट घेतली आहे. 

अधिक वाचा : दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी फोनवर झालेलं हे संभाषण...

आरिफ जमाल यांनी सांगितले की, मी दाऊदला भेटलो नाही पण त्याच्याशी बोललोही आहे.  आरिफ म्हणतात, दाऊद पाकिस्तानात मोठ्या थाटात पाक सरकारचा पाहुणा बनून राहत आहे. मी एका जर्नालिस्ट मित्राच्या माध्यमातून दाऊदला भेटलो आहे. त्यावेळी आम्ही वचन घेतले होते की जे पण पाहणार, ऐकणार त्याबद्दल काही लिहणार नाही. माझ्याकडे एक व्हिज्युअल आहे, त्याचा वापर मी कधी तरी करू शकेल. 

पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने राहतोय दाऊद 

दाऊदने कराचीमध्ये भेटायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी कोणी पाकिस्तानी सैन्यातील व्यक्ती सुरक्षेसाठी नसल्याचे आरिफ जमाल यांनी सांगितले. पण आरिफ यांच्यामते विना पाक सैन्याच्या मदतीशिवाय दाऊदसारखा व्यक्ती पाकिस्तानच्या जमीनीवर राहूच शकत नाही.  आरिफ यांच्यामते, हे तेवढं खरं आहे की, पाकिस्तानी लष्कराची दाऊदला साथ मिळाली नसती तर तो यापूर्वीच मारला गेला असता, किंवा त्याला हकलून दिले असते. 

अधिक वाचा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती

पाकिस्तानचे पत्रकार आरिफ जमाल सध्या अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये राहत आहे. त्या सांगितले की, दाऊदशी भेट ही पहिल्यापासून निश्चित केली होती. तसेच ठरले होते की, आम्ही कोणत्याही अवैध धंद्याबद्दल बोलणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.