नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे शेवटचे वाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना माऊंटबॅटन यांच्यातील प्रेमसंबंध अनेकदा चर्चेचा विषय ठरलेत. यावरच बोलताना आता एडविना यांची नात एश्ली हिक्स हिनं एक धक्कादायक दावा केलाय.
'द टेलिग्राफ'शी बोलताना एश्ली हिक्स हिनं आपली आजी एडविना यांचे पंडित नेहरुंशी कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध नव्हते... कारण, नेहरु 'इम्पोटेन्ट' म्हणजेच नपुंसक आणि शक्तीहीन होते, असा दावा केलाय.
आपली आजी एडविना यांचं आणि नेहरुंचं नातं दाट भावनांनी बहरलेलं होतं... परंतु, नेहरुंच्याच एका बहिणीनं त्यांच्या शारीरिक कमजोरीबद्दल माहिती दिली होती.... त्यामुळे एडविना - नेहरु यांच्यात शारीरिक संबंध होण्याचा प्रश्नच नव्हता.
हिक्स हिची आई पामेला अँडरसन यांनीही आपल्या आत्मचरित्रात नेहरु-एडविना यांच्या भावनिक संबंधांना दुजोरा दिला होता. 'आपली आई एक बेपर्वा प्रेमिका होती जी कोणत्याही चिंतेशिवाय शारीरिक संबंध बनवण्यावर विश्वास ठेवत होती' असंही पामेला यांनी म्हटलं होतं.