सॅनफ्रान्सिस्को : भरघोस पगार देण्यात अनेक कंपन्यांनी सध्या आघाडी घेतलीय. पण, अॅपलचा मात्र याबाबतीत कुणीही हात धरू शकेल, असं तरी सध्या दिसत नाहीय.
'अॅपल'नं आपल्या कंपनीच्या सीईओला जवळपास ५० करोड रुपये वार्षिक पगार दिलाय. इतकंच नाही तर नफ्यामध्ये शेअरच्या बोनससहीत अनेक आर्थिक बक्षीसांनी त्यांना सन्मानित केलं जातं.
आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी असलेल्या 'अॅपल'ची दोरी सध्या सीईओ म्हणून टीम कूक यांच्या हातात आहे. या जबाबदारीसाठी गेल्या वर्षी ९२ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ५० करोड रुपये पगाराचं पॅकेज मिळालं होतं. यामध्ये अनेक नकद बोनसचाही समावेश आहे. कूक यांना एक वर्षापूर्वी याच्या अर्धा पगार मिळत होता.
'आयफोन ६'नं बाजारात एकच धूमाकूळ घातल्यानंतर कंपनीच्या विक्री आणि नफ्यात भरभक्कम वाढ झालीय. यामुळेच कूक यांनाही याचा फायदा मिळाला. कूक यांना २०१४ मध्ये १७ लाख डॉलर (जवळपास १० करोड रुपये) वेतन आणि ६७ लाख डॉलर (जवळपास ४० करोड रुपये) भत्ता मिळाला होता.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत अॅपलची कमाई १८२.८ अरब डॉलर (जवळपास १००० अरब रुपये) झालीय. कंपनीला यातून तब्बल ३९.५ अरब डॉलर म्हणजेच २०० अरब रुपयांचा लाभ झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.