पंतप्रधान नरेंद्र मोदींना अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगानिस्तानमध्ये शनिवारी देशाचा सर्वोच्च नागरिक सम्मान आमिर अमानुल्लाह खान अवार्डने सन्मानित करण्यात आलं.

Updated: Jun 4, 2016, 10:13 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींना अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगानिस्तानमध्ये शनिवारी देशाचा सर्वोच्च नागरिक सम्मान आमिर अमानुल्लाह खान अवार्डने सन्मानित करण्यात आलं.

अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घानी यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा हा सन्मान करण्यात आला. याआधी दोन्ही नेत्यांनी मैत्रीचं प्रतीक असणाऱ्या 'अफगान-इंडिया फ्रेंडशिप डॅम'चं उद्घाटन केलं. ज्याला आधी सलमा डॅम नावाने ओळखलं जात होतं. याची निर्मिती भारताने अनुदान देवून केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.