भाड्याच्या घरात राहणारा पंतप्रधान

सुशील कोईराला हे नेपाळचे तीन वर्षापासून पंतप्रधान आहेत, ते आजही भाड्याच्या घरात राहतात. ते आता पंच्याहत्तरीत आहेत.

Updated: Feb 11, 2014, 03:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नेपाळ
सुशील कोईराला हे नेपाळचे तीन वर्षापासून पंतप्रधान आहेत, ते आजही भाड्याच्या घरात राहतात. ते आता पंच्याहत्तरीत आहेत.
कोईराला घराणं हे पाकिस्तानचं भुट्टो आणि भारताच्या गांधी परिवारासारखं आहे. सुशील कोईराला यांना हॉलीवूडमध्ये हिरोची भूमिका करण्याची इच्छा होती.
मात्र नशिबाने ते नेपाळच्या राजकारणात आले, अनेकवेळा मंत्रिपद त्यांच्या पायाशी लोळण घालत होतं. मात्र त्यांनी ते वेळोवेळी नाकारलं.
नेपाळचं संविधान पूर्ण करण्याचं त्यांचं स्वप्न आहे, यासाठी ते हॉलिवूडच्या हिरोला लाजवतील अशी कामगिरी पार पाडतायत.
गिरिजा प्रसाद कोईराला ही त्यांची सख्खी मावशी. यात बीपी काईराला, सुशील कोईराला आणि गिरीजा प्रसाद कोईराला यांना भारताच्या जेलमध्ये काही दिवस काढावे लागले होते. अभिनेत्री मनिषा कोईरालाही याच घराण्यातली आहे.
नेपाळच्या शाही सरकारवर दबाव टाकण्यासाठी एका नेपाळी विमानाचं हायजॅक करण्याचा आरोप त्यांच्यावर होता.
वयाच्या पंच्याहत्तरीतही ते अविवाहीत आहेत. सुशील कोईराला काठमांडूत आपल्या नातेवाईकाकडे राहतात. गिरिजा प्रसाद कोईराला यांचं २०१० मध्ये निधन झाल्यानंतर, सुशील कोईराला नातेवाईकांच्या घरी राहण्यास निघून गेले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.