पनामा : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भावी अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची स्तुती केली, यावेळी ओबामा यांनी हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील, असं म्हटलं पनामा येथे झालेल्या कार्यक्रमात बराक ओबामा बोलत होते.
ओबामा म्हणाले, 'हिलरी क्लिंटन २००८ मध्ये अध्यक्षपदाच्या मजबूद दावेदार होत्या. पण, त्यांनी मला पाठिंबा दिला. त्या एक यशस्वी परराष्ट्र मंत्री ठरल्या आहेत. आमच्यामध्ये चांगली मैत्री आहे. मला असे वाटते, की त्या अमेरिकेच्या सर्वोत्तम अध्यक्ष ठरतील. देशाच्या प्रगतीसाठी हिलरी क्लिंटन यांच्याकडे चांगले व्हिजन आहे.'
यावरून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष होण्याची संधी हिलरी यांना आहे. ओबामा २००८ मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष बनले होते, तेव्हा हिलरी क्लिंटन या परराष्ट्र मंत्री होत्या. तसेच तेव्हाच ओबामांनी हिलरीच अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील असे स्पष्ट केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.