प्रिन्स हॅरी अभिनेत्रीसोबत 'लिव्ह इन' संबंधात!

ब्रिटनचा छोटा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वदूर पसरल्यात. 

Updated: Feb 4, 2017, 04:28 PM IST
प्रिन्स हॅरी अभिनेत्रीसोबत 'लिव्ह इन' संबंधात! title=

लंडन : ब्रिटनचा छोटा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वदूर पसरल्यात. 

प्रिन्स हॅरी आणि मेघन एकमेकांसोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत असल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलंय. 

या दोघांच्या मित्र-मैत्रिणींकडून ही बातमी समोर आलीय. परंतु, ब्रिटिश राजघराण्यातून मात्र या दोघांच्या संबंधांवर कुणीही काहीही बोलण्यास तयार नाही. 

प्रिन्स हॅरी आणि मेघन काही दिवसांपूर्वी एका डिनर डेटवरही एकत्र दिसले होते. यावेळी या दोघांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले होते. उल्लेखनीय म्हणजे, मेघन हिचा यापूर्वी एकदा विवाह झाला असून ती घटस्फोटित आहे... आणि हॅरीपेक्षा ती तीन वर्षांनी मोठी आहे. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हे दोघे सध्या प्रिन्स हॅरीच्या नॉटिंघम कॉटेजमध्ये एकत्र राहत आहेत. हे कॉटेज केनसिंग्टन पॅलेसमध्ये आहे. इथंच प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनदेखील राहत आहेत.