न्यूयॉर्क : अमेरिकेच्या एका चीअरलीडरने १५ वर्षाच्या एका किशोरवयीन मुलावर रेप केला, मात्र कोर्टाने या महिलेला शिक्षा देण्याऐवजी दोन वर्षाच्या प्रोबेशनवर सोडून दिलं.
अमेरिकाच्या जॉर्जटाउनमध्ये 48 वर्षीय माजी चियर लीडर मॉली शॅटकने 15 वर्षाच्या मुलावर रेप केला.
न्यायालयाने मॉलीला १५ वर्षांची शिक्षा सुनावली, मात्र शिक्षेवर अंमलबजावणी करण्याऐवजी, मॉलीला दोन वर्षांचं प्रोबेशन देण्यात आलं.
या दरम्यान जर तिची वागणूक चांगली असेल तर तिची मुक्तता करण्यात येईल.
प्रोबेशनच्या नियमानुसार मॉलीला दर आठवड्याला प्रोबेशन ऑफिसला भेट द्यावी लागणार आहे.
दरम्यान दुसरीकडे शिक्षेत मोठी सूट मिळाल्यानंतर पीडीत मुलाच्या वडिलांनी म्हटलं आहे की, बलात्कार हा एक मोठा अपराध आहे, याची शिक्षा तुरूंगवासच असली पाहिजे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.