आठव्या मजल्याच्या खिडकीवर चढला ३ वर्षाचा चिमुरडा, व्हिडिओ वायरल

रशियाच्या शेल्याबिंस्क शहरातील हा व्हिडिओ सध्या जगभरात वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा आपल्या घराच्या खिडकीच्या काठावर उभा आहे. तो ही आठव्या मजल्यावर... खिडकीला धरून विविध करामती तो करतोय. हे दृश्य पाहून आपला प्राण कंठाशी येईल.

Updated: Oct 4, 2015, 01:42 PM IST
आठव्या मजल्याच्या खिडकीवर चढला ३ वर्षाचा चिमुरडा, व्हिडिओ वायरल  title=

मुंबई: रशियाच्या शेल्याबिंस्क शहरातील हा व्हिडिओ सध्या जगभरात वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा आपल्या घराच्या खिडकीच्या काठावर उभा आहे. तो ही आठव्या मजल्यावर... खिडकीला धरून विविध करामती तो करतोय. हे दृश्य पाहून आपला प्राण कंठाशी येईल.

तीन वर्षाचा हा चिमुरडा खिडकीबाहेर आल्याचा हा व्हिडिओ शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं रेकॉर्ड केला आणि पोलिसांना सूचना दिली. सुदैवानं काहीही वाईट घडलं नाही, त्या मुलाला सुखरूप खाली उतरवलं गेलं. 

पण यावेळी आई-वडिलांचं लक्ष कुठे होतं. आपल्या घरात लहान मुल असतांना कुणा एका तरी व्यक्तीचं लक्ष मुलाकडे असावं, हे म्हणतात ते उगीच नाही. अशा घटनांवरून ते सिद्धच होतं. 
 
पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.