सौदीत ४७ दहशतवाद्यांची मुंडकी छाटली

सौदी अरबमध्ये दहशतवाद्यांना किती क्रूर शिक्षा देण्यात येते याचं उदाहरण नुकतचं समोर आलंय. 

Updated: Jan 2, 2016, 04:55 PM IST
सौदीत ४७ दहशतवाद्यांची मुंडकी छाटली title=

नवी दिल्ली : सौदी अरबमध्ये दहशतवाद्यांना किती क्रूर शिक्षा देण्यात येते याचं उदाहरण नुकतचं समोर आलंय. 

नव्या वर्षात दुसऱ्याच दिवशी शिया धर्मगुरु निम्र अल निम्र यांच्यासहीत ४७ जणांचे मुंडके छाटले गेलेत. या सर्वांवर दहशतवाद पसरवण्याचा आरोप होता. 

या सगळ्यांची मुंडके छाटल्यानंतर लगेचच सरकारी टीव्ही चॅनलवर सौदी गृहमंत्रालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. ठार करण्यात आलेले सगळे जण अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. 

शिया धर्मगुरुंनाही ठार केल्यामुळे ईराणकडून मात्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय. सौदी अरेबियाला लवकरच याची किंमत चुकवावी लागेल, अशी प्रतिक्रिया इराणनं व्यक्त केलीय. 

२००३ ते २००६ दरम्यान झालेल्या दहशतवादी घटनेसाठी अलकायदाशी संबंधित अनेक जणांना अटक केली होती. इस्लामी कायद्याचं पालन करत इथं हत्या, बलात्कार, धर्मपरिवर्तन, ड्रग्स व्यापार, लूटमार करणाऱ्यांची मुंडकी छाटण्याची शिक्षा इथं दिली जाते.