नवी दिल्ली : सौदी अरबचा बादशाह सलमान बिन अब्दुल अजीज यांनी तब्बल एक महागडं हॉटेल आपल्या आगामी दौऱ्यासाठी बुक केलंय. या हॉटेलच्या बुकिंग हा सध्याचा चर्चेचा विषय ठरलाय.
सलमान यांनी तब्बल 80 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 1,18,92,42,10 रुपये खर्चुन हे हॉटेल बुक केलंय. तुर्कीच्या दक्षिण प्रांतातल्या अंताल्या भागात 'मरदान पॅलेस' हे हॉटेल आहे.
लवकरच, सलमान अजीज तुर्कीच्या 18 दिवसांच्या यात्रेवर जाणार आहेत. इथं ते जी-20 शिखर सम्मेलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठीच त्यांनी हे लक्झरी हॉटेल बुक केलंय.
जी-20 शिखर संमेलनाच्या काही दिवस अगोदरच सौदीचा बादशाह इथं दाखल होणार आहे. जी-20 शिखर संमेलन 15-16 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सलमान यांच्या लवाजम्यात 100 लोक सहभागी असतील. या सर्वांसाठी हे हॉटेल बुक करण्यात आलंय. विशेष म्हणजे, जेव्हापर्यंत सलमान या हॉटेलमध्ये असतील तेव्हापर्यंत इतर कुणालाही या हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.