मुंबईत पाहिलं नाही असं एन्काऊंटर पाहा LIVE

Updated: Sep 9, 2015, 10:45 PM IST

ब्राझील : ब्राझिलमधील लाईव्ह एनकाऊन्टरचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र या एन्काऊंटरमध्ये तरूणीला वाचवणाऱ्या एका अनाथाचा मृत्यू झाला आहे.

एका व्यक्तीने चर्चजवळ एका तरूणीला ओलीस ठेवलं होतं. ज्या व्यक्तीने या तरूणीला ओलीस ठेवलं होतं, त्याच्या हातात पिस्तुल देखील होतं, तरी देखील ती तरूणी व्हिडीओत त्याचा सतत विरोध करतांना दिसते, हे सर्व एका चर्चच्या पायऱ्यांवर सुरू होतं.

या व्यक्तीला पोलिसांनी दोन्ही बाजूंनी घेरलं होतं, मात्र त्याच्या हातात पिस्तूल असल्याने ते हतबल होते.

अखेर एका अनाथ माणसाने यात महत्वाची भूमिका पार पाडली. ज्याने त्या मुलीला ओलीस ठेवलं होतं, त्याचा बराच वेळ मागे लक्ष नव्हतं, याचा फायदा घेत त्याने त्या मुलीपासून त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला.

यात पीडीत मुलीला बाजूला होण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर जोरदार गोळीबार केला. यात तरूणीला ओलीस धरणारा व्यक्ती जागीच मारला गेला.

पण ज्याने तरूणीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यालाही गोळ्या लागल्या, आणि जागीच तोही गतप्राण झाला, या गोळ्या ओलीस ठेवणाऱ्या आरोपीच्या झाडल्या होत्या का हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.