कुणावर काय वेळ येईल सांगत येत नाही, बारा हत्तीचं बळ हा शब्दप्रयोग आपण आपल्या बोलण्यात अनेक वेळा वापरत असतो. मात्र एका तरूण हत्तीला दोन पर्यटकांच्या बळाची गरज पडली.
या दोन पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालून, अंगात बारा हत्तीचं बळ आणलं आणि चार दिवसांपासून चिखलात अडकलेल्या एका हत्तीची सुटका केली. हा प्रकार झिम्बाब्वेच्या एका जंगलात घडला.
तडपत्या उन्हात चार दिवसांपासून हा हत्ती अडकून पडला होता, त्याला बाहेर काढण्यासाठी दोन ट्रॅक्टर मागवावे लागले, पण दोर बांधता येईना, म्हणून पोटाखाली चिखलातून बांबूच्या सहाय्याने दोर बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला तो यशस्वी झाला, आणि तब्बल दहा तासानंतर हत्तीला कोणतीही इजा न होता, बाहेर काढण्यात यश आले
पर्यटकांना या हत्तीच्या अवकळा पाहावल्या नाहीत, त्यांनी चिखलात उतरून हत्तीला दोर बांधून, बाहेर खेचले, हत्तीनेही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आणि हत्ती चिखलातून मुक्त झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.