इराकमध्ये वस्तूंप्रमाणे वाटल्या गेल्या तरूणी, यौन शोषण

जिहादी समूह इस्लामिक स्टेटने इराकच्या याजिदी अल्पसंख्याक समुदायाच्या तरुणी आणि लहान मुलांचे अपहरण केल्यानंतर त्यांना लुटलेल्या वस्तुंप्रमाणे वाटले आणि त्यांचे यौन शोषण केले. त्यामुळे यातील काही तरुणींनी आत्महत्या केली. 

Updated: Dec 24, 2014, 05:09 PM IST
इराकमध्ये वस्तूंप्रमाणे वाटल्या गेल्या तरूणी, यौन शोषण title=

बगदाद : जिहादी समूह इस्लामिक स्टेटने इराकच्या याजिदी अल्पसंख्याक समुदायाच्या तरुणी आणि लहान मुलांचे अपहरण केल्यानंतर त्यांना लुटलेल्या वस्तुंप्रमाणे वाटले आणि त्यांचे यौन शोषण केले. त्यामुळे यातील काही तरुणींनी आत्महत्या केली.

या सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ज्या तरुणींना यौन दासी म्हणून शिकार बनविले त्यांचे वय केवळ १४ ते १५ वर्ष आहे. तर काही मुलींचे वय त्यापेक्षाही कमी आहे. 

इसीसच्या दहशतवाद्यांनी या वर्षी जूनमध्ये इराकच्या अनेक भागांवर कब्जा केला आहे. तसेच शेजारचा देश असलेला सिरीयाच्या काही भागासह इस्लामी जिहाद पुकारला आहे. या सर्व प्रकारांमध्ये उत्तर इराकच्या याजिदी आणि दुसऱ्या अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य केले जात आहे. 

मानवाधिकार समूह एमनेस्टी इंटरनॅशनलनुसार अनुसार या अल्पसंख्याक समूहांना लक्ष्य बनवण्यात येत आहे. देशात जातीय नरसंहार, हत्या आणि अनेकांना दास बनवायचे आणि त्यांचे आयुष्य मरणाहून वाईट करण्याचे काम हे दहशतवादी करीत आहेत. यातील एका १९ वर्षांच्या जिलान या मुलीने बलात्काराच्या भीतीने आत्महत्या केली. या प्रमाणे इतर मुलींनी आत्महत्या केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.