येरुशिलम : इस्त्राईलचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान शिमोन पेरिस यांचं आज वयाच्या 93 व्या वर्षी तेल अव्हिवमध्ये निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
इस्त्राईलच्या स्थापनेपासून झालेल्या प्रत्येक महत्वाच्या घटनेचे शिमोन पॅरेज साक्षीदार होते. जवळपास सत्तर वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदांवर काम केलं. याशिवाय 1994मध्ये मध्य आशियात शांततेसाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना नोबेल शांतीपुरस्कारानंही गौरवण्यात आले होते.
पन्नासच्या दशकात इस्त्राईलला अणुशक्ती सज्ज करण्यासाठी फ्रान्सच्या मदतीनं पॅरेज यांनी छुप्या पद्धतीनं अणु संयंत्र आयात केल्याची चर्चा रंगली. तर 1970मध्ये युगांडताल्या विमानतळावर इस्त्राईल विमान प्रवाशांची अपहरणातून सुटका करण्यातही पेरेस यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.