न्यूयॉर्क : अमेरिकेतील छत्रपती फांऊडेशनच्या माध्यमातून जगभरात पसरलेल्या भारतीयांनी मागील ३ वर्षांपासून जागतिक स्तरावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
अमेरिकेतील प्रसिद्ध टाईमस्केअर येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमात मराठीसह इतर प्रांतातील लोकंही सहभागी होतात. महाराष्ट्रातील काही युवकांनी एकत्र येऊन तीन वर्षापूर्वी छत्रपती फाऊंडेशनची स्थापना केली. स्वपनील खेडेकर, विनोद झेंडे, महेंद्र सिनारे, माधुरी झिंजुरडे, मिजुमिल मुकादम, प्रशांत भुसारी, रोहन डाबरे, अक्षय नाईक, रूपेश नाईक, केशरी मुद्रस, प्रभाकर जगताप, निकम सर, अदिती भूतेकर, श्रुती पाटील या तरुणांच्या नेतृत्वाखाली छत्रपती फांऊडेशनची स्थापना झाली.
आज जगभरात अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी होण्यास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी न्युयॉर्कमध्ये छत्रपती फांऊडेशनच्या वतीने जॉब मार्केट इन अमेरिका, एच१ बी वीजा आणि अमेरिकेतील नोकरी आणि व्यावसाय या संदर्भातील माहिती देण्यासाठी एका वर्कशॉपचं आयोजन केलं गेलं होतं.
जगभरात अमेरिका, कॅनडा, रशिया, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलंड, दुबई, कतार, हॉलंड या देशांमध्ये शिवजंयती साजरी होत आहे.
पाहा व्हिडिओ