सिंगापुरात भारतीय तरुणाचा घात की अपघात?

सिंगापूरमध्ये ‘छोटा भारत’ म्हणून ओळखला जाणारा हॅम्पशायर हा रस्ता आणि रेस कोर्स रस्ता या भागात एका भारतीय मजुराचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातानंतर शहरात उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी २४ भारतीयांसह २७ दक्षिण आशियायी मजुरांना अटक करण्यात आली आहे. तसेच या अटकेत एक स्थानिक आणि दोन बांगलादेशी मजुरांचादेखील समावेश आहे. हा अपघात झाल्यानंतर रात्री तिथे जमलेल्या ४०० जणांच्या जमावाने खाजगी बसची नासधूस केली.

Updated: Dec 10, 2013, 05:49 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, सिंगापूर
सिंगापूरमध्ये ‘छोटा भारत’ म्हणून ओळखला जाणारा हॅम्पशायर हा रस्ता आणि रेस कोर्स रस्ता या भागात एका भारतीय मजुराचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातानंतर शहरात उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी २४ भारतीयांसह २७ दक्षिण आशियायी मजुरांना अटक करण्यात आली आहे. तसेच या अटकेत एक स्थानिक आणि दोन बांगलादेशी मजुरांचादेखील समावेश आहे. हा अपघात झाल्यानंतर रात्री तिथे जमलेल्या ४०० जणांच्या जमावाने खाजगी बसची नासधूस केली.
मजुराच्या अपघाती मृत्युनंतर जमावानं १६ वाहनांची मोडतोडदेखील केली. या संतप्त झालेल्या जमावाच्या हिंसाचारात १० पोलिसांसह १८ व्यक्तीं जखमी झाल्याचं समजतंय. अटक करण्यात आलेल्या मजुरांवर घातक शस्त्रांसह दंगल घडविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह. अटक करण्यात आलेले सर्व मजूर २३ ते ४५ वर्षे या वयोगटातले आहे.
अपघातात बळी पडलेला मजूर तमिळनाडूमधील असून तो ‘हेंग हप सुन’ या कंपनीत दोन वर्षांपासून काम करत होता. या गंभीर अपघातात त्याचे शीर धडापासून वेगळे झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर दाखविण्यात येत होतं. परंतु प्रत्यक्षात त्याच्या डोक्याअवर काही जखमा झाल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलंय.
सिंगापूरचे पंतप्रधान ‘ली हेसीन लूंग’ यांनी ‘दंगलीची ही घटना गंभीर आहे आणि या दंगलीच्या सूत्रधारांची पर्वा केली जाणार नाही’ असं म्हटलं आहे. तसेच घटनेचे गंभीर्य ओळखून सिंगापूरचे भारतीय उच्चायुक्त विजय ठाकूरसिंह यांनी भारतीय जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ