www.24taas.com, वृत्तसंस्था, सोल/दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.
प्रवक्त्यानं सांगितलं, जवळपास 476 प्रवासी जहाजात होते आणि त्यांच्या बचावासाठी आम्ही तटरक्षक दलासोबत हेलिकॉप्टर सुद्धा पाठवले आहेत. यापूर्वी 350 प्रवासी जहाजात होते, असं सांगण्यात आलं होतं.
प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. हे विद्यार्थी जाजूच्या दक्षिण रिसॉर्ट बेटावर पिकनिकसाठी जात होते. बचावकार्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 130 प्रवाशांना वाचवण्यात पहिलेच वाचवण्यात यश आलंय. योनहाप वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार एका प्रवाशानं फोनवर माहिती देतांना सांगितलं की जहाज झुकायला लागलं तसं आम्ही सीटवर राहण्यासाठी आजूबाजूला धरलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.