www.24taas.com, पुणे
भारतीय वंशाची अंतरळावीर सुनीता विल्यम्स हिने काल पुण्यातील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. शेकडो विद्यार्थी आपल्याला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जमलेले पाहून तिला अश्रू अनावर झाले. अंतराळातून परतल्यानंतर तेथील अनुभव सुनिताने विद्यार्थ्यांना सांगितले. अंतराळातील अनुभव साधतानाच तिने महिलांना दिली जाणारी वागणूक आणि पुरूषांचे असणारे वर्चस्व यावरही तिने आपलं मत व्यक्त केलं.
सुनीता विल्यम्सने महिलांवर होणारे अत्याचार याविषयीही भाष्य केले. दिल्लीतील गँगरेप घटनेनंतर उत्सफूर्तपणे करण्यात आलेले आंदोलनाविषयी विचारले असता. तिने आपलं मत व्यक्त केले. ही घटना अतिशय वाईट आहे. पुरूषांचे महिलांसोबतचे वागणे अतिशय बेजबाबदारीचे आहे. पुरुषांप्रमाणेंच महिलांनाही सन्मान मिळायला हवा. असं सुनीता विल्यम्स म्हणाली.
`सुमारे 18 हजार मैल प्रतितास या वेगाने फिरताना पृथ्वीची छायाचित्रे काढण्यासाठी खास प्रशिक्षण घेतले होते. पृथ्वी आणि ताऱ्यांना एकाच वेळी पाहण्याचा तो आनंद काही वेगळाच असतो. ब्रह्मांडामध्ये किती ऊर्जा आहे आणि आपली पृथ्वी किती लहान आहे, याची जाणीव त्या ठिकाणी होते,`` असे ती म्हणाली.
भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून "स्मार्ट` विद्यार्थी घडत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार करावा. काम करताना आनंद मिळेल, ते सहजरीत्या होईल, अशा क्षेत्राची निवड त्यांनी करावी. त्यानंतर त्या विषयाशी संबंधित संस्थेबरोबर काम करावे आणि स्वतःचे स्थान निर्माण करावे, असेही त्या म्हणाल्या. `माघार घेण्याऐवजी प्रश्नध सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करावा. जुन्याच्या जागी नव्या संकल्पनांचा विचार करावा.'
तसेच सुनिताने एका महत्त्वाच्या विषयाकडेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. ग्लोबल वार्मिंगबाबत तिने चिंता व्यक्त केली आहे. ‘पृथ्वीवर अतिशय महत्त्वाचे असे बदल घडत आहेत. जेव्हा मी २००७ मध्ये अंतराळात गेली होती त्यानंतर आता केलेल्या अंतराळात प्रवासात ही गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून आली’. असे तिने सांगितले.