भारतीय दूतावासाजवळ स्वीडन येथे अतिरेकी हल्ला, तिघांचा बळी

स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झालाय. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आलाय. यामध्ये किमान तिघांचा बळी गेलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2017, 11:14 PM IST
भारतीय दूतावासाजवळ स्वीडन येथे अतिरेकी हल्ला, तिघांचा बळी title=

स्टॉकहोम : स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झालाय. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आलाय. यामध्ये किमान तिघांचा बळी गेलाय. 

हा अतिरेकी हल्लाच असल्याचे स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोवेन यांनी म्हटले आहे. भारतीय दूतावासापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडलीये. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक वाहिन्यांनी या हल्ल्यात किमान 5 जण ठार झाल्याचा दावा केला असला, तरी त्याला अधिकृत पुष्टी मिळू शकली नाही. मात्र हल्ल्यामध्ये जखमींची संख्या मोठी असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.