सीरीयातील रासायनिक हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला

सीरीयामधील इदबिल प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात 58 जणांचा  मृत्यू झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 5, 2017, 02:16 PM IST
सीरीयातील रासायनिक हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला title=

इदबिल : सीरीयामधील इदबिल प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात 58 जणांचा  मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 11 लहान मुलांचाही समावेश आहे. सीरियातील इदलिब प्रांतातील खान शयखून इथं हा केमिकल झालाय.. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर श्वास गुदमरून लोकांचा मृत्य झालाय.

तर सीरियातील विरोधी पक्षांच्या उच्चस्तरीय समितीने या हल्ल्यात सुमारे 100 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली विमाने सीरियातील होती की सीरियन सरकारचे मित्र राष्ट्र असलेल्या रशियाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान, क्लोरिन गॅसचे चार थर्मोबेरिक बॉम्ब टाकण्यात आल्याचा दावा मंगळवारी एका फेसबुक पोस्टवरून करण्यात आला होता.  युरोपियन महासंघ आणि संयुक्त राष्ट्रांनी ब्रसेल्स इथं आयोजित केलेल्या दोन दिवसीय संमेलनाआधीच ही घटना घडली आहे.