पुरेशी झोप घ्या, नाहीतर नोकरी गमवाल...

पुरेशी झोप न झाल्यानं आरोग्य बिघडतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याच कारणामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीवर पाणी सोडावं लागू शकतं... हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Updated: Aug 5, 2014, 04:46 PM IST
पुरेशी झोप घ्या, नाहीतर नोकरी गमवाल...  title=

वॅाशिंग्टन : पुरेशी झोप न झाल्यानं आरोग्य बिघडतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याच कारणामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीवर पाणी सोडावं लागू शकतं... हे तुम्हाला ठाऊक आहे का?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुरेशी झोप न झाल्यानं व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर, एकाग्रतेवर आणि स्मृतीवर विपरीत परिणाम होतो.

कोलंबियाच्या 'हॉवर्ड काउंटी सेन्टर फॉर लंग्ज अॅन्ड स्लिप मेडिसिन' विभागाचे संचालक इमर्सन विकवायर यांच्या म्हणण्यानुसार, 'पुरेशी झोप न मिळाल्यानं व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम दिसून येतो... झोपेची ही कमतरता आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेऊनही भरून निघत नाही'.

अशा आजाराला बळी पडणाऱ्या व्यक्तींच्या मनात नेहमी एक भय असतं की त्यांची नोकरी कधीही जाऊ शकते... त्यांच्यापेक्षा एखादा उमदा व्यक्ती त्यांची जागा सहज घेऊ शकतो... त्याचं प्रमोशनही होऊ शकतं... अशी भीती त्यांना सतत वाटत राहते. 

साधारणत: वयोवर्ष 20 ते 30 या गटातील व्यक्तींना बहुतांश वेळा पुरेशी झोप न झाल्याची तक्रार जाणवते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'काही व्यक्तींचं रात्रीचं जीवन व्यस्त असल्यानं त्यांना केवळ चार-पाच तासांचीच झोप मिळते... झोपेत अनेक कारणांनी खंड पडतो... काहींना ताण तणावामुळेही झोप येत नाही... तर काहींना झोपेच्या गोळ्यांची सवय जडल्यानं ते पुरेशी आणि शांत झोप घेऊ शकत नाहीत... पण, अशा स्थितीत चुकीचे निर्णय घेतले तरी ते बरोबरच आहेत असं  या व्यक्तींना वाटत राहतं'. 

कार्यक्षमतेत घट होणं, सेक्सची इच्छा कमी होणं, एकाग्रतेचा अभाव आणि डिप्रेशन ही लक्षणं या आजाराला बळी पडलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. यापासून मुक्ती मिळवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत दिवसाचे आठ तास झोप घेणं आवश्यक आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.