मुंबई : ९० च्या दशकात तालिबानने जेव्हा अफगाणिस्तान वर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी टीव्ही, संगीत आणि सिनेमागृहांवर बंदी घातली.
अफगाणिस्तानमध्ये अशा अनेक महिलांच्या जीवन कथा समोर आल्या आहेत ज्यामुळे जगातील सर्वाच देशांना मोठा धक्का बसला आहे. येथे महिलांना कोणत्याही गोष्टीचं स्वातंत्र्य नाही. महिलांवर पुरुष येथे मोठ्या प्रमाणात अन्याय करतात.
काही दिवसांपूर्वी एका महिलेला वेश्य़ाव्यवसाय करण्यास नकार दिल्यामुळे तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी तिचा छळ केला आणि तिला एका खोलीत बंद करुन ठेवलं.
एक प्रसिद्ध महिला गायक देखील या तालीबानी नियमांमधून सुटलेली नाही. ती चेहऱ्यावर स्काफ लावत नाही म्हणून सतत तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्मंस करणं या गायिकेला अवघड होऊन बसलं आहे.