लंडन : आर्थिक मंदीमुळे ग्रीस देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याचा परिणाम येथे वेश्या व्यवसायावर दिसून येत आहे. मंदीमुळे देह व्यापार संकटात आलाय. शरीर विक्रीसाठी अनेक तरुणींना एक वेगळाच सामना करावा लागत आहे. वेश्याव्यवसाय सहभागी महिलांना एका सँडविच किंमतीत त्यांचे शरीर विक्री करणे भाग पडत आहे.
पूर्व युरोप महिलांची तुलना करता ग्रीक महिलांची वेश्याव्यवसायत जास्त संख्या होती. अन्थेंसस्थित पॅनटिओन युविव्हर्सिटीचे समाजशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक ग्रेगरी लाजोस यांच्या अहवालानुसार अनेक मुली आपले शरीर पनीरवाला सामोसे किंवा एका सॅंडविच किंमतीत त्यांना विकावे लागत आहे. या मुली अस करीत आहेत, कारण त्यांना उपाशी रहावे लागू नये आणि खाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून.
डेली मेलच्या वृत्तानुसार ग्रीसमध्ये केलेल्या अभ्यासात १८,५०० सेक्सकर्मियोंना सहभागी करुन घेतले होते. अभ्यासानंतर असे समजले की, जो बदल होत आहे. तो समाजात नकारात्मक आहे. हे नकारात्मक व्यवस्थेचे धोरण याला कारणीभूत ठरत आहे. लाजोस यांचा दाखला देत द टाइम्सने म्हटलेय, ग्रीसवरील आर्थिक संकट जेव्हा सुरु झाले त्यावेळी सेक्स विक्रीची किंमत ५० युरो होती. आर्थिक संकटामुळे आता २ युरोवर आलेय.
ग्रीसमध्ये वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. मात्र, वाढती बेरोजगारी आणि कमी किंमत यामुळे सेक्स उद्योग संकटात असून त्याची घसरण झाली आहे. लाजोस यांनी सांगितले की, सेक्स व्यवसायात वाढती तरुणींची संख्या आश्चर्यचकीत करणार आहे. ८० टक्के ग्रीक महिलांचा या व्यवसायावर कब्जा आहे. सेक्स उद्योग वाढून तो ६०० मिलियन युरोचा झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.