सीरिया : सीरियात असद यांच्या विरोधकांनी एक व्हिडिओ जारी केलाय. लॅटकियात रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल या हल्ल्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय.
शिकागो पोलिसांचा निषेध
२०१४ सालच्या पोलीस गोळीबाराविरोधात शिकागोमध्ये हजारो आंदोलकांनी रस्ता अडवला. मोठमोठ्या स्टोअर्सचे रस्ते अडवून धरले. ब्लॅक फ्रायडेचा बहिष्कार म्हणून हे करण्याचं आवाहन करण्यात आलं. शिकागो पोलिसांच्या गोळीबारात एक कृष्णवर्णीय तरूण ठार झाला होता. याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक केला गेला.
रशियाचे कडक पाऊल
रशियानं टर्कीसोबत व्हिसाफ्री व्यवस्थेला रोखण्याचा निर्णय घेतलाय. ही व्यवस्था 1 जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल. टर्कीत सेनेद्वारे रशियाचं लढाऊ विमान पाडल्यानंतर हा निर्णय रशियानं घेतलाय.
ISISसाठी समर्थन
ब्रिटीश रॅडिकल प्रिचर अॅन्जेम चौधरी यांनी जामिनावर असताना अटी तोडल्याप्रकरणई पुन्हा तुरूंजात जावं लागंल. अॅन्जेमवर काही लोकांना भेटण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरीही ऍन्जेम या लोकांना भेटले. ISISसाठी समर्थन मागण्याचा आरोपाखाली अॅन्जेमला अटक करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात अॅन्जेमला जामीन मिळाला होता.
रॉकेटचा ढिगारा समुद्रात सापडला
युएसच्या स्पेस रॉकेटचा ढिगारा इंग्लंडजवळ समुद्रात सापडलाय. स्पेस एक्स फाल्कन ९ चा हा ढिगारा असू शकतो असं सांगितलं जातंय. जून २०१५ मध्ये हे स्पेस उड्डानावेळीच दुर्घटनाग्रस्त झालं होतं.
अमेरिकेत बर्फवृष्टी
मध्य अमेरिकेत बर्फवृष्टीनंतर रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दक्षीण डकोटामध्ये दिड इंच बर्फाचा थर झालाय. लोकांना सावधगिरी बाळग्याचे आवाहन करण्यात आलंय. नेब्रास्कामध्ये बर्फवृष्टीमुळे गाड्या घसरून रसत्याच्या कडेला आल्यात.
पोप आफ्रिका दौऱ्यावर
पोप फ्रान्सिसी आफ्रिका दौऱ्यादरम्यान युगांडामध्ये पोहचले तेव्हा त्यांना मानणाऱ्यांची मोठी गर्दी होती. स्टेट हाऊसला संबोधित करताना शरणार्थ्यांची समस्या सोडवणं हे संपूर्ण जगासाठी परीक्षेसमान असल्याचं यावेळी पोप फ्रान्सिस यांनी सांगितलं.
कॉमनवेल्थ समीट
ब्रिटनच्या महाराणी एलिबेथ यांनी माल्टामधअये कॉमनवेल्थ समीटला सुरूवात केली. यावेळी समिटमध्ये जलवायु परिवर्तन हा एक मोठा मुद्दा आहे. कॉमनवेल्थ समितीमध्ये ५३ देशांचे प्रतिनिधी सहभागी झालेत.
शेतकऱ्यांचे शांततेत आंदोलन
स्वित्झर्ल्ँडच्या बर्न शहरात १० हजार शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन केलं. कृषी बजेटमध्ये ८०० मिलियनची कपात केली जाण्याच्या प्रस्तावाला विरोध म्हणून हे आंदोलन शेतकऱ्यांनी केलं. या निर्णयामुळे शेती करणे आणखी कठीण होईल असं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं.
ख्रिस्मसची सुरूवात
पुरू्व युरोपात जर्मनीच्या प्रसिद्ध नर्मबर्ग ख्रिस्टकिंडल अर्केट समारोहाला सुरूवात झालीय. याला ख्रिस्मसची सुरूवात मानलं जातं. पॅरिस हल्ल्याच्या पार्शअवभमूवर या समोरोहाला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.