अमेरिका: सोशल नेटवर्किंग साइट्स जिथं अनेक तरूणांसाठी उपयोगी ठरत आहेत. तर दुसरीकडे अशा काही घटना सोशल साइट्समुळे घडतात की त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नुकतीच एक अशी धक्कादायक घटना पुढे आलीय. एका मुलीनं फेसबुकवर आपल्याच वडिलांना दोन वर्ष डेट केल्याचं पुढे आलंय.
तसं तर फेसबुकवर मित्र बनवणं, लग्न करण्यापर्यंतचे किस्से सामान्य आहेत. पण अमेरिकेत एका वडिलांनी आपल्या सख्या मुलीला दोन वर्ष डेट केल्यानंतर आता त्यांनी लग्न करण्याचं ठरवलंय. या घटनेमुळं सगळेच हादरले आहेत.
डेली मेलमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या ग्रेट लेक्स भागात राहणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचं आपल्या वडिलांवरच प्रेम जडलं आणि दोघांनी एकमेकांना तब्बल २ वर्ष डेटही केलं.
काय आहे घटना?
घटना अशी आहे की, तरुणीची आई आणि तिचे वडील हे कॉलेजमध्ये असतांना एकत्र होते. त्यांच्यात प्रेम होतं आणि दोघांमध्ये संबंधही झाले. यानंतर तरुणीची आई प्रेग्नेंट झाली. दरम्यान, तरुणीचे आई-वडील वेगळे झाले. ९ महिन्यांनंतर तरुणीच्या आईनं तिला जन्म दिला आणि एकटीनंच तिला वाढवलं. काही वर्षानंतर तरुणीच्या आईनं तिला बोर्डिंगमध्ये टाकलं.
जेव्हा तरूणी १६ वर्षांची झाली तिच्या फेसबुकवर एका व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिनं ती एक्सेप्ट केली आणि दोघांमध्ये मैत्री झाली. आपलं नातं कळल्यानंतरही त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतर दोघं भेटले शारिरिक संबंधही त्यांच्यात झाले. आता त्यांना लग्न करायचंय.
अजून तरूणीच्या आईला याबाबत माहिती नाहीय. या दोघांनी तरुणीच्या आईला आपल्या नात्याबद्दल सांगण्याचा निर्णय घेतलाय. तरुणीचं म्हणणं आहे की, तिला आपल्या वडिलांकडून मुल हवंय. तिच्या नजरेत आता ते तिचे पिता नाही तर तिचं प्रेम आहे. यानंतर लवकरच ते दोघं लग्न करणार आहेत.
लग्नानंतर दोघांनी न्यू जर्सीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. कारण तिथं एडल्ट इंसेस्ट म्हणजे एकाच कुटुंबातील व्यक्तींमधील संबंध वैध मानले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.