मुंबई : स्वित्झरर्लंडमध्ये पार पडलेली 'आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा' जिंकून बॉलिवूडचा अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमणनं 'आयर्नमॅन'चा खिताब हस्तगत केलाय.
19 जुलै रोजी स्वित्झर्लंडच्या ज्युरिखमध्ये ही स्पर्धा पार पडली. ट्रायथलॉन जगातील सर्वात कठिण रेसपैंकी एक म्हणून ओळखली जाते. यंदा या स्पर्धेत 2000 जणांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये 7 भारतीय स्पर्धकांचा समावेश होता.
या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग (पोहणं), 180.2 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावणं न थांबता केवळ 16 तासांत पूर्ण करायचं होतं. मिलिंदनं हे आव्हान केवळ 15 तास 19 मिनिटांत पूर्ण केलं.
छोट्या पडद्यावरच्या 'कॅप्टन व्योम' या कार्यक्रमातून मिलिंद घराघरात दाखल झाला होता. त्यानंतर, तरकीब, जुर्म, जोडी ब्रेकर्स आणि एलेक्स पांडियन यांसारख्या सिनेमांतही त्यानं महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.