जकार्ता : कैदींना नदी किनारी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार करून त्यांना नदीत टाकून देणाऱ्या आयसिसला एका मुस्लिम देशाने जाहीररित्या आव्हान दिले आहे.
देशभरातून अनेक मुस्लिम लोक आयसिसला वेगवेगळ्या प्रकारे विरोध करत आहेत. जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडोनेशियाने आता जाहीरपणे आयसिसचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी एक 90 मिनिटांचा सिनेमा बनवला आहे ज्यात आयसिस हा इस्लामपेक्षा वेगळा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
इंडोनेशियामधील एका इस्लामिक संस्थेने 3 दिवसीय परिषदेचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये या 90 मिनिटांच्या सिनेमाचं स्क्रिनिंग केलं गेलं ज्यामध्ये जिहादी हा इस्लाम आणि पैगंबर यांचा चुकीचा वापर करत असल्याचं दाखवलं आहे.
इंटरनेटद्वारे हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. ज्यामुळे जिहादी आणि आयसिसला अधिक तीव्रपणे विरोध करता येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.