आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

Updated: May 22, 2017, 09:41 PM IST
आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन title=

शिकागो : वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे. वृद्ध आणि शिक्षकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जातात. भारताच्या या संस्कृतीचं दर्शन आयआयटी शिकागोमध्येही घडलं. आयआयटी शिकागोच्या कनव्होकेशन कार्यक्रमात एक भारतीय विद्यार्थी डिनच्या पाया पडला.

गौरव झवेरी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. गौरवनं पायाला हात लावल्यावर डिनही त्याच्याकडे पाहात राहिले. गौरवचा हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.