पाकिस्तानात लग्नापूर्वी Sexमुळे मी काय शिकले? कॅनडातील महिलेचा लेख झाला वायरल, Pakमध्ये वादंग

 कॅनडा राहणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेने सेक्स लाइफवर लिहिण्यात आलेल्या लेखावर सध्या पाकिस्तानात वादंग निर्माण झाला आहे. लेखिका जेहरा हैदर हिचा लेख एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

Updated: May 4, 2016, 02:49 PM IST
पाकिस्तानात लग्नापूर्वी Sexमुळे मी काय शिकले? कॅनडातील महिलेचा लेख झाला वायरल, Pakमध्ये वादंग title=

नवी दिल्ली :  कॅनडा राहणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेने सेक्स लाइफवर लिहिण्यात आलेल्या लेखावर सध्या पाकिस्तानात वादंग निर्माण झाला आहे. लेखिका जेहरा हैदर हिचा लेख एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

पाकिस्तानात वादंग..

या लेखात तिने पाकिस्तानात राहताना लग्नापूर्वी सेक्स संबंध ठेवल्याच्या घटनांचा उल्लेख केला आहे. तिच्या सेक्स लाइफ संदर्भात लिहिलेल्या लेखामुळे पाकिस्तानात वादंग निर्माण झाला आहे. तसेच पाकिस्तानात हा लेख व्हायरल झाला आहे. 

काय होतं लेखाचं शीर्षक..

इंग्रजी वेबसाइटमध्ये 'पाकिस्तानमध्ये लग्नापूर्वी सेक्समुळे मी काय शिकले' प्रसिद्ध झालेल्या या लेखाचे शीर्षक  होते. लेखात जेहराने पाकिस्तान राहताना लग्नापूर्वी केलेल्या सेक्स संदर्भात अनेक उल्लेख केले आहे. लग्नापूर्वी सेक्स केल्यावर पाकिस्तानात खूप वादंग निर्माण होतो. यावर पाकिस्तानातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

सेक्स विषय टॅबू...

जेहराने आपल्या लेखात म्हटले की, पाकिस्तान एक इस्लामिक आणि कट्टरपंथी देश आहे. यात पॉर्न पाहण्यात लोक सर्वात पुढे आहे. आम्ही (पाकिस्तानी लोक) सेक्ससाठी खूप उत्साही आहे. तरीही पाकिस्तानात सेक्स एक टॅबूचा विषय आहे. पाकिस्तानात कोणतीही मिडल क्लास किंवा लोअर क्लासची मुलगी लग्नापूर्वी सेक्स करताना पकडली गेली. तर खूप वाद निर्माण होतो. 

लग्नापूर्वी सेक्सला शिक्षा

लग्नापूर्वी सेक्स केल्यास गरीब मुलींना शिक्षा देण्याची पद्धत आहे. ही पद्धत माजी राष्ट्राध्यक्ष जिया उल हक या हुकूमशाहच्या काळापासून सुरू आहे. पण आता अशाप्रकारची शिक्षा कमी झाली आहे. पण लोकांच मानसिकता तशीच आहे. 

१२ पेक्षा अधिक जणांशी सेक्स...

२०१२ मध्ये कॅनडामध्ये शिक्षणासाठी येण्यापूर्वी मी सुमारे १२ जणांशी सेक्स संबंध ठेवले होते. पाकिस्तानात मला खूप दबावाखाली जीवन जगावे लागले. पाकिस्तानात मी अनेक प्रकारे सेक्स केला. माझ्या पार्टनरच्या घरी किंवा त्याच्या वडिलाच्या ऑफिसमध्ये, निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या कारममध्ये आणि सेक्ससाठी अनेकवेळा हॉटेलही यूज केले. 

गर्भनिरोधक अधिक वापरतात....

जेहराने पुढे लिहिले की, आजही पाकिस्तानातील लोक लग्नापूर्वी सेक्स संबंध ठेवतात आणि प्रमाणापेक्षा अधिक गर्भनिरोधक वापरतात. इस्लाममध्ये गर्भपात करणे हराम आहे.

 

स्वतःला वेश्या समजत होती...

आपल्याला गांभिर्याने विचार करायला पाहिजे की जगातील सर्वात कामोत्तेजित लोक पाकिस्तानात आहे. मी स्वतःला गश्ती (वेश्या) समजत होती पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही.