आयसीसमध्ये भारतीय तरूणांच्या भरतीसाठी ३ महिला कार्यरत

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एक मोठ्या कटाचा खुलासा केला आहे, या संघटनेने सोशल नेटवर्किंगचा वापर करून, मुलांना कट्टरपंथी करून आयएसमध्ये सामिल कऱण्याचा ते प्रयत्न करीत आहे.

Updated: May 17, 2016, 06:18 PM IST
आयसीसमध्ये भारतीय तरूणांच्या भरतीसाठी ३ महिला कार्यरत title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एक मोठ्या कटाचा खुलासा केला आहे, या संघटनेने सोशल नेटवर्किंगचा वापर करून, मुलांना कट्टरपंथी करून आयएसमध्ये सामिल कऱण्याचा ते प्रयत्न करीत आहे.

यात तीन महिलांचा समावेश आहे, या महिला तरूणांची नियुक्ती करतात, या महिला अर्जेंटिना, श्रीलंका आणि फिलिपाईन्सच्या आहेत. भारतीय मुलांना आयसीसशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

या महिलांनी आतापर्यंत एका ग्रुपमध्ये एकूण २५ जण जमवले आहेत. ते भारतीय आहेत. सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहेत, त्या व्हॉटसअॅप फेसबुकचा वापर करीत आहेत.