मुंबई: एड्सारखा मोठा आजार २०३० सालापर्यंत संपुष्टात येईल असा अनुमान संयुक्त राष्ट्रानं मांडलाय.
भारतासहीत संपूर्ण जगात गेल्या १५ वर्षांत तीस कोटी एचआयव्हीचा संसर्ग होण्यापासून टळला आहे.
भारत हा एचआयव्ही प्रभावित पहिल्या पाच देशात आहे.
दीड कोटी लोक एचआयव्हीवर उपचार घेत आहेत. २०११ मध्ये सदस्य राष्ट्रांनी आपलं दीड कोटींचं महत्वाकांक्षी लक्ष्य साध्य केलं आहे.
तसंच आम्ही २००० सालापासून एड्स संबंधित सुमारे ८० लाख मृत्यूंना चकवा दिला आहे, असं वक्तव्य संयुक्त राष्ट्र एड्स कार्यक्रमाचे माहिती व मूल्यमापन संचालक पीटर घाईस यांनी दिलंय.
२००० ते २०१४ या कालावधीत जगात एचआयव्हीचे संक्रमण ३५ टक्क्यांपर्यंत खाली आलंय. ८३ देशात नवीन संक्रमणला महत्वपूर्ण ढंगात कमी केले आहेत. शिवाय त्यात वाढही झालेली नाही.
याशिवाय ज्या देशांमध्ये एचआयव्ही रोगाची संख्या अधिक आहे तिथंही बराच बदल करण्यात आला आहे. यात भारत, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया तसंच झिम्बाब्वे सामिल आहेत, असेही ते म्हणाले.
भारतात २०१४ मध्ये ७,८५,१९१ रोग्यांवर अॅंटी रेट्रोवायरलचे उपचार होत होते. यात ११,७२४ गर्भवती महिला सामिल होत्या तर १४ वर्षांखालील ४५,५४६ मुलांचेही उपचार चालू होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.