एका वर्षात ब्रिटनच्या ४३ मुली बनल्या 'जिहादी दुल्हन'

मागील एका वर्षात ब्रिटनमधील एकूण ४३ तरुणींनी 'जिहादी दुल्हन' बनण्याचा निर्णय घेऊन आपले बस्तान सिरियामध्ये हलवले आहे, या संदर्भातील माहिती ब्रिटीश पोलिसांनी मंगळवारी सादर केली. 

Updated: Jul 15, 2015, 02:51 PM IST
एका वर्षात ब्रिटनच्या ४३ मुली बनल्या 'जिहादी दुल्हन' title=

लंडन : मागील एका वर्षात ब्रिटनमधील एकूण ४३ तरुणींनी 'जिहादी दुल्हन' बनण्याचा निर्णय घेऊन आपले बस्तान सिरियामध्ये हलवले आहे, या संदर्भातील माहिती ब्रिटीश पोलिसांनी मंगळवारी सादर केली. 

पोलिसांच्या आकडेवारीनुसार सुमारे 700 लोक जिहादी समुहात जाण्यासाठी ब्रिटनमधून सिरियामध्ये गेले होते. त्यातील निम्मे परत आले. पण महिलांच्या परत येण्याची आकडेवारी त्यांच्याकडे नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचे गट वेगवेगळ्या युक्त्यांनी महिलांना गंडवून त्यांचा उपयोग करून घेत आहेत. 

दहशतवाद्यांचे गट संपूर्ण प्रकारे महिलांचे ब्रेनवॉश करण्यात सफल होत आहेत. 

यामुळे जिहादी दुल्हन बनल्यामुळे सगळ्या समस्या निघून जातील असे महिलांना वाटते. अशाप्रकारे त्या सापळ्यात अ़डकल्या जातात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.