मंगळावर दिसले गौतम बुद्ध, UFO साइटिंग डेलीचा दावा

 मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध लागल्याचे दावे वैज्ञानिकांकडून वेळोवेळी लावण्यात आले आहे, पण आता असा दावा समोर आला आहे, की तो सर्वांना चकीत करणार आहे. एलियन्सचा शोध घेणारी एक संस्था यूएफओ साईटिंग्ज डेलीने मंगळावर गौतम बुद्धांची विशाल प्रतिमा असल्याचा दावा केला आहे. 

Updated: Oct 16, 2015, 09:44 PM IST
मंगळावर दिसले  गौतम बुद्ध, UFO साइटिंग डेलीचा दावा  title=

नवी दिल्ली :  मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध लागल्याचे दावे वैज्ञानिकांकडून वेळोवेळी लावण्यात आले आहे, पण आता असा दावा समोर आला आहे, की तो सर्वांना चकीत करणार आहे. एलियन्सचा शोध घेणारी एक संस्था यूएफओ साईटिंग्ज डेलीने मंगळावर गौतम बुद्धांची विशाल प्रतिमा असल्याचा दावा केला आहे. 

संस्थाने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये महात्मा बुद्धची एक भव्य मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा फोटो मंगळ ग्रहावरील आहे. फोटोमध्ये मूर्तीच्या डाव्या बाजूला फिरलेले एक मुख आहे, तसेच छाती, पोट आणि खांदेही दिसत आहेत. 

संस्थेनेने दावा केला की हा फोटो मंगळ ग्रहावर विकसीत जीवन होण्याचे प्रमाण आहे. विशेष म्हणजे हे पहिल्यांदा असे झाले नाही, यापूर्वीही मंगळ ग्रहावर अशा प्रकारच्या आकृती दिसण्याचे दावे करण्यात आले आहे. दरम्यान वैज्ञानिक या मूर्तिला सावलीची कमाल मानतात. 

यूएफओ हंटर वेबसाइट स्कॉट वेअरिंगने यूएफओ सायटिंग डेलीमध्ये लिहिले आहे की हा फोटो मंगळवार अस्तित्वात असलेल्या जीवनाचा पुरावा देत आहे. नासा याबद्दल जगाला सांगू इच्छित नाही. नासा सत्य लपवत आहे. त्यांच्याकडून जग सर्व तंत्रज्ञानाची माहिती मागेल. त्यांना ही माहिती कोणाला द्यायची नाही. 

स्कॉट वेअरिंगने दावा केला की महात्मा बुद्धच्या मूर्तीशिवाय खूप काही मंगळवारवर सापडलं आहे. पण त्याबद्दल नासा काही खुलासा करीत नाही. यापूर्वी एक महिला मंगळावर दिल्याचा दावाही करण्यात आला, तसेच चमच्यासारख्या वस्तूचेही फोटो काढण्यात आले आहे. तसेच अंतराळातील खेकड्यांची उपस्थिती असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.