'सर्जिकल स्ट्राईक'च्या भारताच्या दाव्यांवर संयुक्त राष्ट्राचा आक्षेप

भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या दाव्यावर संयुक्त राष्ट्रानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

Updated: Oct 1, 2016, 05:10 PM IST
'सर्जिकल स्ट्राईक'च्या भारताच्या दाव्यांवर संयुक्त राष्ट्राचा आक्षेप title=

नवी दिल्ली : भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या दाव्यावर संयुक्त राष्ट्रानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांच्या म्हणण्यानुसार, संयुक्त राष्ट्राच्या सैन्य प्रेक्षक दलानं भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कोणताही गोळीबार पाहिलेला नाही. या कथित सीमा उल्लंघनाबाबत आम्हाला केवळ बातम्यांमधून माहिती मिळालीय, असं त्यांनी म्हटलंय. 

दरम्यान संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत सैय्याद अकबरउद्दीन यांनी स्टिफन यांच्या या दाव्याला फेटाळून लावलंय. कुणी काही पाहिलंय किंवा नाही यातून घटना बदलू शकत नाहीत... जे खरं आहे ते खरंच राहतं... आम्ही काही तत्थ समोर ठेवलीत आणि आम्ही त्यावर कायम आहोत, असं त्यांनी म्हटलंय.

काय आहे संयुक्त राष्ट्राचं सैन्य प्रेक्षक दल?

संयुक्त राष्ट्राचं सैन्य प्रेक्षक दल भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषेवर १९७१ मध्ये लागू करण्यात आलेल्या संघर्ष विरामवर देखरेख ठेवतं.