हेडली-राणाच्या शिक्षेची घोषणा जानेवारीत...

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला येत्या १७ जानेवारी रोजी तर १५ जानेवारीला तहाव्वूर राणा याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेची घोषणा करण्यात येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 29, 2012, 08:57 AM IST

www.24taas.com, मुंबई
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला येत्या १७ जानेवारी रोजी तर १५ जानेवारीला तहाव्वूर राणा याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेची घोषणा करण्यात येणार आहे. अमेरिकेतील शिकागो कोर्ट या दोघांनाही शिक्षा सुनावणार आहे.
अमेरिकेचा नागरिक असलेला डेव्हिड हेडली लष्कर – ए - तैय्याबाचा दहशतवादी असून मुंबई दहशतवादी हल्ल्यात या दोघांनी सहभाग घेतल्याचा आरोप आहे. हेडलीला जन्मठेप तर तहाव्वूर राणाला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त होतीय. शिकागो येथील जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश हॅरी लेनिनबर हे या शिक्षेची घोषणा करणार आहेत. कोर्टाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, येत्या १५जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ . ४५ वाजता राणाच्या शिक्षेची घोषणा होईल. तर १७ जानेवारी २०१३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ . ४५ वाजता हेडलीच्या शिक्षेची घोषणा होईल.
अमेरिकेचा नागरिक असलेल्या हेडलीनं चौकशीत तपास अधिकाऱ्यांना केलेल्या मदतीमुळे तसंच सर्व आरोप मान्य केल्यानं त्याला फाशीची शिक्षा देण्यात येणार नाही, हे अगोदरच जाहीर करण्यात आलंय. मुंबई हल्ल्यासाठी पाहणी करणे , कटाच्या आखणीत आणि अंमलबजावणीतमहत्त्वाची भूमिका बजावणे , दहशतवाद्यांना विशेष मार्गदर्शन करणे तसेच डेन्मार्कच्या वृत्तपत्रावर झालेल्याहल्ल्याच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी हेडलीला दोषी ठरवण्यात आले आहे तर डेन्मार्कच्या वृत्तपत्रावरझालेल्या हल्ल्याप्रकरणी राणाला दोषी ठरवण्यात आले आहे . राणाची मुंबई हल्ल्याच्या आरोपातून ठोसपुराव्यांअभावी सुटका झाली आहे .