१०० व्या वाढदिवशी तिनं अनुभवला स्कायडायव्हिंगचा थरार!

वयाची शंभराव्वी गाठल्यावर एका महिलेनं आपल्यातलं साहस आणि जिद्द कमी झालेलं नाही हे अनोख्या पद्धतीनं दाखवून दिलंय. या महिलेनं १०० व्या वर्षी स्कायड्रायव्हिंगचा थरार अनुभवलाय.

Updated: Nov 11, 2014, 08:03 AM IST
१०० व्या वाढदिवशी तिनं अनुभवला स्कायडायव्हिंगचा थरार! title=

न्यूयॉर्क : वयाची शंभराव्वी गाठल्यावर एका महिलेनं आपल्यातलं साहस आणि जिद्द कमी झालेलं नाही हे अनोख्या पद्धतीनं दाखवून दिलंय. या महिलेनं १०० व्या वर्षी स्कायड्रायव्हिंगचा थरार अनुभवलाय.

आपल्या नव्वदाव्या वाढदिवशी स्कायड्राइव्ह करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांनाही या महिलेनं मागे टाकलंय. एलीनोर कनिंघम असं या महिलेचं नाव आहे. त्या न्यूयॉर्कला राहतात. 

जिद्दीला आणि हौसेला वयाचं बंधन नसतं, हे या महिलेनं प्रत्यक्षात दाखवून दिलंय. आपल्या १०० व्या वाढदिवशी आकाशातून खाली उडी मारण्याअगोदर या महिलेनं आपल्या कुटुंबातील एका सात महिन्यांच्या मुलीला आपल्या कवेत घेऊन तिच्या कपाळाच्या चुंबन घेतलं. 

एलीनोर यांनी शनिवारी गांज-वूर्ट या ठिकाणी सरटोगा ‘स्कायडायव्हिंग’च्या साहाय्यानं हा थरार अनुभवला. हा त्यांनी घेतलेला स्कायडायव्हिंगचा तिसरा अनुभव होता. वयाच्या ९० व्या वर्षीही त्यांनी हाच अनुभव घेतला होता. 

कनिंघम या आपल्या नातीसोबत मध्य न्यूयॉ४कच्या स्कोहायरे या भागात राहतात. आपण केवळ त्यांना त्यांच्या मर्जीमुळे स्कायडायव्हिंग करण्याची परवानगी देत आहोत, असं त्यांच्या डॉक्टरनं अगोदरच स्पष्ट केलं होतं. 

कनिंघम या आत्तापर्यंतच्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्यासोबत स्कायड्रायव्हिंगचा थरार अनुभवलाय, असं सरटोगा स्कायडायव्हिंगचे डीन मॅक्डॉनल्ड यांनी स्पष्ट केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.