VIDEO : पत्नी मेलानियानं भर कार्यक्रमात ट्रम्प यांना मारली 'कोपरखळी'!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष भवन व्हाईट हाऊसमध्ये एक गंमतशीर दृश्यं पाहायला मिळालं... आणि हेच दृश्यं कॅमेऱ्यातही कैद झालं. 

Updated: Apr 18, 2017, 06:35 PM IST
VIDEO : पत्नी मेलानियानं भर कार्यक्रमात ट्रम्प यांना मारली 'कोपरखळी'! title=

वॉशिंग्नट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष भवन व्हाईट हाऊसमध्ये एक गंमतशीर दृश्यं पाहायला मिळालं... आणि हेच दृश्यं कॅमेऱ्यातही कैद झालं. 

अजानतेपणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक चूक घडली... आणि तेव्हा त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी ती चूक लक्षात आणून देण्यासाठी हलकेच त्यांच्या हातावर हात मारला... हा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झालाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

ईस्टरनिमित्तानं व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशाचं राष्ट्रगीत सुरू होत... या राष्ट्रगीतासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया आणि मुलगा राष्ट्रगीतासाठी उभे होते... 

पण, याच वेळी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ट्रम्प आपल्या छातीवर हात ठेवण्याचं विसरले. यानंतर पत्नी मेलानियानं ट्रम्प यांच्या हातावर हलकेच हात मारला... आणि इशाऱ्यातच त्यांना याची आठवण करून दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या छातीवर हात ठेवला. या घटनेवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया न उमटतील तरच नवल...