'काश्मीर पाकिस्तानमध्ये यायची वाट पाहतोय'

काश्मीर पाकिस्तानमध्ये येईल, या दिवसाची मी वाट बघतोय, अशी गरळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओकली आहे.

Updated: Jul 22, 2016, 11:30 PM IST
'काश्मीर पाकिस्तानमध्ये यायची वाट पाहतोय' title=

मुझफ्फराबाद : काश्मीर पाकिस्तानमध्ये येईल, या दिवसाची मी वाट बघतोय, अशी गरळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओकली आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये नवाज शरीफ यांच्या पक्षाला विजय मिळाला. या विजयानंतर नवाज शरीफ यांनी मुझफ्फराबादमधल्या जाहीर सभेमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 

काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तिथले नागरिक प्राणाची बाजी लावत आहेत. त्यांचा हा लढा विसरू नका असंही शरीफ या सभेमध्ये म्हणाले.