फ्लॉरिडा : अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात राहणाऱ्या महिलेला अखेर आयुष्याचा साथीदार मिळाला आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात विशेष ते काय? त्याचं विशेष असं की त्या महिलेचे जगात सर्वात लांब केस आहेत.
अशा मंडेला या आफ्रिकी-अमेरिकन वंशाच्या महिला अमेरिकेती फ्लोरिडा राज्यात राहतात. जगात सर्वाधिक लांब केस असण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पण, याच कारणामुळे त्यांचं लग्न होण्यात अडचणी येत होत्या. पण, आता मात्र त्यांचं केनियातील हेअर ड्रेसर इमॅन्युअल शेग यांच्याशी लग्न झालंय.
अशा यांच्या केसांची लांबी तब्बल ५५ फूट इतकी आहे. यामुळेच त्यांचं नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय. त्यांचं वय ५० वर्ष आहे. पण, त्यांच्या केसांमुळे त्यांच्याशी कोणी लग्न करत नसल्याने त्या अविवाहीतच होत्या.
पण, एक दिवस फेसबूकवर त्यांची मैत्री केनियातील इमॅन्युअल यांच्याशी झाली. पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर ते एकमेकांसोबत खुश आहेत.
दरम्यान डॉक्टरांनी अशा यांना केस कापण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्या केसांते वजन त्यांच्या मानेला आणि पाठीला त्रासदायक ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण, अशा आणि इमॅन्युअल यांना मात्र त्याची पर्वा नाही. अशाचे केस न कापण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.