मुंबई : जगभरात यावेळी सध्या ३ नेते अधिक चर्चेत आहेत. सर्वात प्रभावी आणि शक्तीशाली नेता म्हणून या ३ नेत्यांची चर्चा आहे. या ३ नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रूसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे त्यांची रिस्ट वॉच म्हणजेच हातातलं घड्याळ.
१- नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घड्याळ्यांचं कलेक्शन करणं पसंद आहे. याचं घड्याळ स्विस लग्जरी वॉच कंपनी बनावते. ही कंपनी मोवादो ईबेल, कॉनकॉर्ड, ईएसक्यू, ह्यूगो, बॉस, लाकोस्टे आणि टॉमी हिल फिगर यासारखे घड्याळं बनवते.
2- ब्लादिमीर पुतीन
रशियाचे राष्ट्रपती हे देखील घड्याळाचे शौकीन आहेत. पुतीन यांना महाग घड्याळं घालणं पसंद आहे. पुतीन यांच्याकडे देखील वेगवेगळ्या घड्याळ्यांचं कलेक्शन आहे ज्याची किंमत ४ कोटी ६८ लाख रुपये आहे.
3- बराक ओबामा
महागड्या आणि लग्जरी घड्याळं वापरणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा देखील नंबर लागतो. बराक ओबामा यांनी मागील १५ वर्षात प्रसिद्ध घड्याळ टॅग हयूरचं एक्वारेसर आपल्या हातात घालतात. हया घड्याळाची किंमत १० लाख ४५ हजार रुपये आहे.