जॉर्जिया: उदारमतवादाचा बडेजाव मिरवणाऱ्या अमेरिकेत, वर्णभेदाची आणखी एक घटना घडल्याचं समोर आलंय. नवं प्रकरण अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातलं आहे. तिथं एका शाळकरी विद्यार्थ्याला, स्कूल बसमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागला.
बसमधल्या इतर विद्यार्थ्यांनी त्याला दहशतवादी म्हणूनही हिणवलं. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली. जानेवारी महिन्यात भारतभेटीवर आलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मायदेशी परतल्यानंतर, भारताला सहिष्णुतेचे डोस पाजले होते. मात्र या वर्षामध्येच आतापर्यंत वर्णद्वेष आणि असहिष्णुतेची तीन उदाहरणं, स्वतःला पुढारलेले म्हणवणाऱ्या अमेरिकेत घडली आहेत.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.